शिवसेना अनसुरे उपविभाग युवा समन्वयकपदी दळे येथील स्वप्निल सोगम यांची निवड….

राजापुर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)

दि:२६:जुलै:लांजा येथे युवासेना कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी युवासेना अणसुरे उपविभाग समन्वयक म्हणून दळे येथील कार्यक्षम युवा शिवसैनिक श्री स्वप्नील सोगम यांची निवड करण्यात आली. श्री सोगम यांना युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा.सुप्रदा फातर्फेकर,श्री अतुल लोटणकर,कुडाळचे उपनगराध्यक्ष श्री मंदार शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.   

यावेळी जिल्हा युवाधिकारी श्री विनय गांगण,उपजिल्हा युवाधिकारी श्री संतोष हातणकर,तालुका समन्वयक श्री प्रसाद माजरेकर, तालुका युवतीधिकारी सौ.श्रृती गोलतकर,उपतालुका समन्वयक श्री सिद्धेश पंगेरकर,उपविभाग युवाधिकारी श्री सागर पवार उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमात सागवे विभाग युवासेना कार्यकारिणीचा विशेष सत्कार करण्यात आला.स्वप्निल सोगम यांच्या निवड़ी बद्द्ल त्यांचे आमदार राजनजी साळवी,विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकार कदम,उपजिल्हा युवाधिकारी संतोष हातनकर,विभागप्रमुख नंदू मिरगुले,उपविभागप्रमुख

गिरीश करगुटकर, विभाग महिला संघटक शैलजा माजरेकर,उपविभाग संघटक शीतल पंगेरकर,शाखाप्रमुख संतोष लासे आदि सहित शिवसेना पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.