आजरा:प्रतिनिधि
दि:२७:जुलै:आजरा तालुक्यातील किणे गावामध्ये घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. सुनिता गुडूळकर असं मृत महिलेचे नाव आहे. आज (27 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. घराच्या चिऱ्याच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने सुनिता यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत पती अर्जुन गुडुळकर देखील जखमी झाले आहेत.