जि.प. प्राथमिक शिक्षक भरतीत स्थानिक प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य द्यावे.

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका राजापूर‌ची निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी:प्रतिनिधि (प्रमोद तरळ)

दि:२७:  रत्नागिरी जिल्ह्यातील यात प्रामुख्याने राजापूर तालुक्यातील अनेक जि.प.शाळामध्ये शिक्षकांच्या तात्पुरत्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. परंतु सदर भरती ही निवृत्त शिक्षकांची करण्यात येत आहे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करुन निवॄत्त शिक्षकांऐवजी स्थानिक बेरोजगार बीएड,डीएड तरुणांना सेवेत सामावून घ्यावे अशा मागणीचे निवेदन आ. डॉ राजनजी साळवी यांना देण्यात आले आहे

तालुक्यात असलेली सुशिक्षित मुलांची बेरोजगारी बीएड आणि डीएड मुलांचा प्रश्न म्हणजे स्थानिकांचा प्रश्न आहे सदर भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित बीएड,डीएड तरुणांना भरती प्रक्रियेत समाविष्ट करायलाच पाहिजे हा प्रश्न जिल्हा परीक्षदचे माजी शिक्षण सभापती सन्मा. दिपकजी नागले यांनी उचलून धरलेला आहे.

पुढे होणाऱ्या भरतीमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य मिळालेच पाहिजे यासाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न चालू आहेत शासनाच्या निर्णयाला निवॄत्त शिक्षक संघटनेने कडाडून विरोध केला आहे स्थानिक बीएड,डीएड तरुणांच्या भविष्याचा विचार करून सर्व कुणबी बांधव अर्थात मातृ संघटना कुणबी समाजोन्नती संघ मुंबई राजापूर शाखा या लढ्याला जाहीर पाठींबा देत आहे.

सदर विषयाबाबत तालूका शाखेमार्फत सध्या सुरु असलेले पावसाळी अधिवेशनात लेखी स्वरूपात निवेदन सन्मा. शिक्षण मंत्री महोदय तसेच सन्मा. आमदार साहेब यांना सादर करण्यात आले.

सदर निवेदन देताना शाखा अध्यक्ष श्री शिवाजी तेरवणकर, सचिव अनिल भोवड, खजिनदार सोनू ठुकरूल, जयवंत नाचणेकर, संतोष जोगळे, प्रभाकर मांडवकर, संजय वारीक, युवाध्यक्ष दिलीप शेडेकर, युवा सचिव वैभव वालम, योगेश लिगम आदी मान्यवर उपस्थित होते