पी एम पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

सहकार ,राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात बाप्पाच योगदान मोलाचे : अशोकराव पाटील

कबनूर :   दिपक पाटील

देश भक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांचे सहकार राजकीय शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे,असे प्रतिपादन आजरा सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील यांनी केले.देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सरपंचशोभा पवार अध्यक्षस्थानी होत्या.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इचलरकंजी येथील गोशाळेत चारा वाटप,आयजीएम रुग्णालयात फळे वाटप,वृद्धाश्रमात ब्लँकेट वाटप,कबनुर स्मशानभूमी येथे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। उपसरपंच सुधीर पाटील,जवाहर सहकारी बँकेचे संचालक बबनराव काळे यांची भाषणे झाली.माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर,ग्रामपंचायत सदस्य सुनिल कडाप्पा,प्रवीण जाधव,अर्चना पाटील,गजानन आमले,बाळासो पाटील शंकर सुतार,जावेद मुजावर,प्रतीक पाटील,सुदाम पाटील,नितीन पाटील सागर परीट,मनोज माने,विष्णू सुतार अनिल हेगडे,आप्पासो पाटील आदी उपस्थित होते.उपसरपंच सुधीर पाटील यांनी आभार मानले.