इचलकरंजी: विजय मकोटे
येथील प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये गटनिहाय स्पर्धेत सौ. सोनाली अजित टेके, सौ. वैशाली राजू खामकर, सौ. संजीवनी महादेव पाटोळे आणि सौ. मोनिका श्रीनिवास फुलपाटी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.विजेत्यांना माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
मागील वर्षीपासून उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वच सण-उत्सवावर निर्बंध आले आहेत. मनात इच्छा असूनही काही करता येत नसल्याने सण आले कधी आणि गेले कधी हेही कळत नव्हते. मात्र शासन निर्बंधांचे पालन करत नगरसेवक मनोज साळुंखे यांनी आपल्या प्रभाग 12 मध्ये घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करुन उत्साह भरला. या स्पर्धेला भागातील नागरिकांचा विशेषत: महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांनी नागरिकांनी स्पर्धेला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले. सर्वांनीच आपापल्या परीने आकर्षक सजावट करुन आपल्या कलागुणांना या माध्यमातून वाव दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक मनोज हिंगमिरे, युवराज माळी, जहांगिर पट्टेकरी, प्रदीप धुत्रे, सुकुमार पाटील, पापा उस्ताद, अनिल ठाणेकर, प्रशांत पांढरपट्टे, सतीश भस्मे, सतीश पाटील, पिंटू खोत, शेखर भंडारे, चांद जमादार, रवी भांडे, सौ. नागुबाई लोंढे, सौ. विद्या सुतार आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व भागातील नागरिक उपस्थित होते