गुलाम पारेख इंटरनॅशनल लीडरशिप पुरस्कारने सन्मानित तर जमूरत अलजी यांना बेस्ट क्लब पुरस्कार प्राप्त

जिल्ह्याचा बेस्ट झोन चेअरमन, प्लॅटिनम आवर्ड,इंटरनॅशनल लीडर शिप अवार्ड अश्या पुरस्काराने सन्मानित

 

कडवई:-मुजीब खान
लायन्स क्लबच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोचून सामाजिक कार्यक्रम राबवून,अनेक लोकांना मदत करून, विविध शिबिराचे आयोजन करून लोकांना आधार देण्याचे कामा जमूरत अलजी आणि गुलाम पारेख यांनी केला असून त्यांच्या कार्याची आणि कामाची दखल घेत गोवा येथे लायन्स क्लबच्या स्मुर्तीगंध कार्यक्रमात गुलाम पारेख यांना इंटरनॅशनल लीडरशिप पुरस्कारने तर जमूरत अलजी यांना बेस्ट क्लब पुरस्काराणे सन्मानीत करण्यात आले.
गोवा येथे लायन्स क्लबच्या माध्यमातून जे लायन्स मेंबर आप आपल्याला भागात उत्तम रित्या काम करत आहेत त्यांच्या पाठीवर शाब्बासकिची थाप मारण्यासाठी व त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक लोकांना सन्मानित करण्यात आले असून रत्नागिरीमध्ये एकूण ३० पुरस्कार प्राप्त झाले असून त्यामध्ये रत्नागिरीला १६, संगमेश्वर ०४, देवरुख ६, न्यू. रत्नागिरी १, गुलाम पारेख यांना वैयक्तिक ३ अश्या पुरस्कारांनी रत्नागिरीला सन्मानीत करण्यात आले. गुलाम पारेख यांना जिल्ह्याचा बेस्ट झोन चेअरमन, प्लॅटिनम आवर्ड,इंटरनॅशनल लीडर शिप अवार्ड अश्या पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यामध्ये लायन्स क्लबचे योगदान महत्वपूर्ण असून विविध समाज उपयोगी उपक्रम केले जात आहे. कोरोना काळात ही लायन्स क्लब संगमेश्वर व इतर क्लबचे योगदान महत्वपूर्ण आहेत. लायन्सच्या या समाजउपयोगी कामाचे अनेक ठिकाणातून कौतुक केले जात असून जमूरत अलजी आणि गुलाम पारेख यांच्या झालेल्या गौरवाबाबत शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.