प्रधानमंत्री पोशणशक्ती योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ केंद्रस्थरीय प्रशिक्षण कुंचांबे येथे पार पडले

 

कुचांबे:-(सचिन पाटोळे)

संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील आदर्श केंद्र शाळा येथे दिनांक ८ मार्च रोजी प्रधानमंत्री पोशणशक्ती योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ केंद्र स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स– -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…

सचिन पाटोळे-9922749187..

नियाझ खान —9921435330..

दिपक तुळसणकर —9730389876)..

नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर सदरील सभेस कुचांबे केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री बाळासाहेब पवार सर यांनी प्रधानमंत्री पोशणशक्ती निर्माण योजना बद्दल माहिती व त्याअंतर्गत येणारा फोर्टीफाईड तांदूळ म्हणजे नक्की काय, त्याचे फायदे कोणते, तो कसा वापरावा याची अगदी सविस्तर माहिती दिली,व व्हिडिओ दाखविला.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामनाथ गायकवाड यांनी केले तर श्री.रवी कवेत सरांनी प्रशिक्षणास उपस्थितांचे आभार मानले. व अध्यक्षांच्या परवानगीने चहापानानंतर प्रशिक्षण संपल्याचे जाहीर केले.

सदरील प्रशिक्षणास केंद्र शाळा कुचांबे येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ निकीता कदम तसेच जिल्हा परिषद शाळा राजिवली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सचिन पाटोळे व जिल्हा परिषद शाळा कुंभारखणी बुद्रुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ ऐश्वर्या गावडे, तसेच तिन्ही शाळा व्यवस्थापन समितीचे प्रत्येकी दोन दोन सदस्य,स्वयंपाकी व मदतनीस, तिन्ही शाळेचे शिक्षक आणि केंद्र प्रमुख श्री.बाबासाहेब पवार सर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.