महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित बासरी सारंगी जुगलबंदी आणि हास्य धमाका या कार्यक्रमाचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा

आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि .२४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यापूर्वी झालेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. या अनुषंगाने दिनांक २६ जून रोजी होणाऱ्या छत्रपती शाहू महाराज जयंतीचे (सामाजिक न्याय दिन) औचित्य साधुन बुधवार दिनांक २५ जून रोजी महानगरपालिका आणि अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अलायन्स हॉस्पिटल येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या करिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच दिनांक शुक्रवार २७ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत इचलकरंजी महानगरपालिका आणि मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व नागरिकांसाठी माई आधार केंद्र येथे आरोग्य शिबीर (मधुमेह, रक्तदाब ) आयोजित केले आहे.
तरी या शिबिराचा लाभ शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तीने घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.त्याचबरोबर शनिवार दिनांक २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता बासरीवादक पंडित विवेक सोनार व सारंगीवादक उस्ताद साबीर खान यांचा जुगलबंदी कार्यक्रम आणि इचलकरंजीतील नृत्यांगना सायली होगाडे आणि त्यांच्या ३० महिला सहकारी नृत्यांगना यांचा बॉलीवूड थीमवर आधारित नृत्यारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.तसेच रविवार दिनांक २९ जून रोजी सकाळी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच सायंकाळी ५ वाजता महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण असलेला हास्यजत्रा या टीव्ही मालिकेतील कलाकार अरुण कदम, श्यामसुंदर रजपूत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, याचबरोबर आकांक्षा कदम, माया शिंदे, सपना राजेश हेमन, अक्षता सावंत, धनश्री दळवी, सुनील जाधव, संदीप डवरे, जयवंत भालेकर या बहुसंख्य कलाकारांच्या सहभागातून हास्य धमाका इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.हे दोन्ही कार्यक्रम श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात मध्ये आयोजित करण्यात आलेलेआहेत.तरी शहरवासीयांनी या दोन्ही कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनेउपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×