इचलकरंजी महापालिका व इनर व्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि .५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिका व इनर व्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शाहपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील वेणूताई यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर क्र.५४  व मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू विद्यामंदिर क्र. २० शाळेसमोरील मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात विविध प्रकारची एकूण २५ रोपे लावण्यात आली. याप्रसंगी महापालिकेच्या सहायक आयुक्त मा. श्रीमती रोशनी गोडे, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा श्रीमती विभा पाटणी, सचिव माधुरी लाहोटी, पीडीसी बिना बगडिया, पीपी रेखा जाजू, सहसचिव अर्चना मानधना, कोषाध्यक्ष इशा खंडेलवाल, आयएसओ ज्योती डागा, एडिटर शशी सिंघवी व क्लबच्या सदस्य निलू पाटणी उपस्थित होत्या.

महानगरपालिकेचे अधिकारी श्री. धनंजय पळसुले, श्री. संजय शेटे, उद्यान निरीक्षक रमेश बेलेकर, वेणूताई यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या कांबळे, मौलाना आझाद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नाहीद समडोळे, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे, अशोक लाखे, महेश बुचडे, निर्मला शिरगावे, कमल मलके तसेच अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस, शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×