इचलकरंजी फेस्टिवल मध्ये “गोल्डन मेलोडीज” संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .३ :स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने गेल्या ३० वर्षापासून सुरू असलेल्या इचलकरंजी फेस्टिवलचे संस्थापक माजी मंत्री प्रकाशजी आवाडे व विद्यमान आमदार डॉ.राहुलजी आवाडे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या इचलकरंजी फेस्टिवल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या “मेलोडीयस पंचम” या कार्यक्रमाच्या दैदीप्यमान यशानंतर श्रीमंत ना.बा.घोरपडे नाट्यगृहात गुरुवार दि.४ रोजी संध्याकाळी ठीक ६.०० वाजता स्वरा एंटरटेनमेंट नीता ठाकूर देसाई प्रस्तुत , एस.एम.होगाडे जॉबर प्रशांत होगाडे व साऊंड इंजिनिअर ऋषिकेश ठाकुर देसाई निर्मित *”गोल्डन मेलोडीज-द ग्रँड म्युझिकल नाईट” हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. साऊंड व लाईट (ध्वनी व प्रकाश) व्यवस्था होगाडे जॉबर यांची असून या संगीतमय कार्यक्रमाचे भव्य असे नियोजन करण्यात आलेले आहे.
नामवंत वादकांच्या संगीत साथीने नीता ठाकूर देसाई,प्रशांत होगाडे, प्रवीण होगाडे, महेश शिंदे व डॉ.दीपक कुंभार हे गायक गीते सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन विक्रम पाटील करणार असून त्यांना ऋतिक कुरणे, गणेश साळोखे, चंद्रकांत घारुंगे, सर्जेराव कांबळे, स्नेहल जाधव व प्रकाश साळोखे अशा अनुभवी वादकांची संगीत साथ लाभणार आहे. स्वप्निल पन्हाळकर आपल्या खास शैलीत निवेदन करणार आहेत.तरी या कार्यक्रमासाठी सर्व संगीत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इचलकरंजी फेस्टिवलच्या संयोजिका मोश्मी आवाडे, तसेच प्रा. शेखर शहा, अहमद मुजावर, संग्राम सटाले , नजमा शेख यांनी केले आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना लकी ड्रॉ द्वारे सिल्वर कॉइन जिंकण्याची संधी मिळणार आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.