डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. अलहिदा जावेद शेख हिची कोल्हापूर जिल्हा संघात निवड
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२५ : बोपखेल पुणे येथे आयोजित ५२ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. अलहिदा जावेद शेख हिची कोल्हापूर जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. तिच्या या निवडीने सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
कु. अलहिदा शेख हिने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळेच तिची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन आणि डायनॅमिक स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, सोनल बाबर यांचे प्रोत्साहन यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.