एएवायएम जेपीएल क्रिकेट स्पर्धेत एम. बी. टायटन्स विजेता

इचलकरंजी:विजय मकोटे
दि:-१२ आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एएवायएम जेपीएल क्रिकेट स्पर्धेत एम.बी. टायटन्स संघाने विजेतेपद मिळविले, तर पॅरिटीअस रायडर्स संघाला उपविजेतेपद मिळाले. प्रकाशलाल प्रितम, प्रफुल्ल, प्रशांत बोरा परिवार बोरा मल्टिकॉर्प इचलकरंजी-पुणे हे प्रायोजक तर संजय घोडावत ग्रुप हे सहप्रायोजक होते.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्या वतीने नऊ वर्षापासून जैन समाजातील युवक एकत्र यावेत यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेत सुराणा स्टार्स, एम. बी. टायटन्स, नमो युनिटी, पेरिटीअस रायडर्स, रायझिंग स्टार्स, युनिटी स्पोटर्स फ्रेंड्स फोरेवर, रोवर्स, एम आर चॅम्प्स, फोर स्केअर आदी संघांचा समावेश होता. साखळी स्पर्धेत सर्वच सामने अटीतटीचे झाले. त्यामध्ये प्रतिस्पध्र्थ्यांना नमवत पॅरिटीअस रायडर्स आणि एम.बी. टायटन्स यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. या अटीतटीच्या लढतीत एम. बी. टायटन्स संघाने अजिंक्यपद मिळविले. स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार जितेंद्र पद्मचंदजी मेहता परिवाराच्या वतीने मानस गांधी यांना देण्यात आला. उत्कृष्ठ गोलंदाज पुरस्कार हिमांशू जैन आणि उत्कृष्ठ फलंदाज पुरस्कार प्रतीक संघवी यांना रतनसिंह जतनसिंह पंकज मेहता परिवाराच्या वतीने देण्यात आला
मुख्य लीग मध्ये प्रथम क्रमांक जीवन राज्य मुकेश कुमार पुनमिया परिवारातर्फे देण्यात आला तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रकाशलाल प्रीतम प्रफुल्ल प्रशांत बोरा परिवार यांच्या वतीने देण्यात आला. तसेच महिला गटातील बोरा ब्लास्टरस आणि रामदेव रावडर्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कांतीलालजी शैलेश उमेश राहुल बोरा परिवार यांच्या वतीने बोहरा ब्लास्टर्स यांना देण्यात आला. तसेच लहान मुलांच्या स्पर्धेत लायन्स प्राइड, मरुधर बॉइज, प्रसन्न बॉइज यामधील अंतिम सामान्यात संजय समीर सुमित मुनोत परिवारातर्फे लायन्स प्राइड यांना पुरस्कार देण्यात आला. मॅन ऑफ द मॅच पुरस्कारचे प्रायोजक मनोजजी रोनकजी भार्वेनजी चंगेडिया परिवार होते. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत आणि प्रशांत बोरा उपस्थित होते. तर स्पर्धेदरम्यान माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर , अशोकराव स्वामी, तानाजी पोवार, दिलीप मुथा, अनिल डाळ्या, महाजन सर आदी मान्यवरांनी भेट दिली. मंचच्या वतीने प्रास्ताविक प्रितम बोरा यांनी केले. स्वागत करण मुथा यांनी केले आभार प्रदर्शन सुमित मुनोत यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!