घरफोडी गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

१.१४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत : शाहापूर पोलिसांची कामगिरी

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि. 19 : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११ ते १८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे २.३० या कालावधीत हातकणंगले तालुक्यातील शाहापूर येथील सावली सोसायटीतील एका बंद घरात घरफोडी झाली होती. या प्रकरणी शाहापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२९/२०२५ भादंवि कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी जेवणासाठी बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या स्लायडिंग खिडकीतून प्रवेश करून सोन्याचे मंगळसूत्र, तीन मोबाईल हँडसेट व एक मोटारसायकल असा मुद्देमाल चोरून नेला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान शाहापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ₹८०,००० किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र₹२६,००० किमतीचे तीन अँड्रॉइड मोबाईल₹८,००० किमतीची मोटारसायकल

असा एकूण ₹१,१४,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्री. योगेश कुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार अविनाश मुंगसे , आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार , शशिकांत ढोणे व ज्ञानेश्वर बांगर यांनी केली.पुढील तपास शाहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!