रातांबी येथे चित्रित ‘चेटुक’ वेब सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि.२१: कोकणातील रातांबी येथे चित्रित करण्यात आलेल्या ‘चेटुक’ या रहस्यमय वेब सिरीजचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
इटरनल फिल्म प्रोडक्शन निर्मित या मालिकेच्या पहिल्या भागाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. गूढ, थरार आणि कोकणातील ग्रामीण वातावरण यांची प्रभावी सांगड दुसऱ्या भागात अधिक गडद करण्यात आली असून कथानक आता अधिक रंजक आणि उत्कंठावर्धक वळणावर आले आहे.कथेचे लेखन अविनाश थोरात यांनी केले असून त्यांच्या लेखणीतून गावाकडील रहस्य, अंधश्रद्धा आणि मानवी मनातील भीतीचे प्रभावी चित्रण उभे राहते. दुसऱ्या भागात काही नवीन घडामोडी आणि अनपेक्षित प्रसंग उलगडत असल्याने प्रेक्षकांची पुढील भागांबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.रातांबी गावातील निसर्गरम्य परिसर, जुन्या वाड्या आणि गूढ वातावरणामुळे मालिकेच्या दृश्यांना वास्तवदर्शी आणि प्रभावी स्पर्श मिळाला आहे. कोकणातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देत तयार झालेल्या या मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.‘चेटुक’चा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.