राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार
'दत्त पॅटर्न' क्षारपड मुक्तीच्या यशोगाथेसाठी सहकार्य
शिरोळ: राम आवळे
दि.२५:राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चोपण, क्षारपड जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज आणि केंद्रीय लवणता सुधार केंद्र कर्नाल हरियाणा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली या तंत्रज्ञानाचा वापर शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्षारपड मुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ यशस्वी ठरला आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशात सामुदायिक पद्धतीने आणि स्वखर्चाने क्षारपड जमीन सुधारणा केल्याची अतिशय कमी उदाहरणे असून गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने झालेले काम हे अतिशय चांगले उदाहरण आहे. क्षारपड मुक्तीच्या कामाची यशोगाथा राहुरी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संशोधनात्मक अभ्यासातून पुढे येणार आहे. या प्रकल्पासाठी सर्व प्रकारची तांत्रिक मदत व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दिली.
हसूर येथे शंभर एकर क्षारपड जमीन सुधारणा मेन लाईन खुदाई कामाचा शुभारंभ, क्षारपड मुक्तीचे झालेल्या कामासंदर्भात आयोजित अभ्यास दौऱ्यात ते बोलत होते. शाश्वत शेती, उत्पादन वाढीसाठीचे नवे उपक्रम, पीक विविधता याला शास्त्रीय अभ्यासाची जोड दिल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून क्षारपड जमिनीचा प्रश्न, त्यावर दत्त पॅटर्नच्या माध्यमातून शोधलेले उपाय याची यशोगाथा मांडली. भूमिगत निचरा प्रणालीतून नदी अथवा ओढ्यात पाणी न सोडता रिसायकलिंग पद्धतीने त्या पाण्याचा वापर करण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून मदत आवश्यक असून तसा प्रस्ताव शासन दरबारी विद्यापीठाने पाठवावा, असे आवाहन गणपतराव पाटील यांनी केले. यावर शासन दरबारी हा प्रस्ताव पाठविण्यासाठी विद्यापीठ निश्चित मदत करेल, असे आश्वासन डॉ. विलास खर्चे यांनी दिले.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संशोधक संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. श्रीमंत राठोड, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ऋषिकेश सोनवणे, कोल्हापूरचे सहयोगी संशोधक संचालक डॉ. सुनील कराड, डॉ. मनोज माळी, डॉ. सचिन महाजन यांच्यासह मान्यवर दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी कवठेगुलंद येथील क्षारपड मुक्तीच्या झालेल्या कामाची पाहणी केली. शेडशाळ येथील महिलांनी चालवलेल्या डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन माहिती घेतली. डॉ. विलास खर्चे यांनी बीजमातांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून बीज बँकेच्या महिलांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. दत्त कारखान्याच्या प्रयोग शाळेला भेट देऊन पाणी, माती व पाने परीक्षणाचीही संपूर्ण माहिती घेतली. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून श्री दत्त कारखान्याकडून राबविण्यात येत असलेल्या ऊस विकासाच्या योजनांसह क्षारपड मुक्तीच्या कामाची माहिती विस्तृतपणे दिली. यावेळी सर्वच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

हसूर येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. प्रशांत बोडके, महालिंग पाटील, दिलीप माणगावे, सचिन सूर्यवंशी आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक दरगु गावडे, बाळासाहेब पाटील हलसवडे, शेखर पाटील, भैय्यासाहेब पाटील, ॲड. प्रमोद पाटील, विश्वनाथ माने, सुरेश कांबळे, महेंद्र बागे, प्रदीप बनगे, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, इंजिनीयर कीर्तीवर्धन मरजे, संतोष दुधाळे, मयूरभाई, मफत पाटील, गजानन चौगुले, शंकर कांबळे, सागर पाटील, मलगोंडा पाटील, रमेश चौगुले, प्रकाश केरीमने, स्वप्निल चौगुले, सुरेश चौगुले, नेमगोंडा पाटील, अभिजीत पाटील, विजय पाटील, संजय पाटील, अलगोंडा पाटील, धनपाल शेडबाळे यांच्यासह विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.