महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागानेच सशक्त महाराष्ट्र घडेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला व बालविकास विभागाचा सक्षम महिला-सशक्त महाराष्ट्र कार्यक्रम

मुंबई: प्रतिनिधी

दि.९: शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले तर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागातूनच सशक्त महाराष्ट्र घडविता येईल, असे प्रतिपादन Devendra Fadnavis यांनी केले.

       जागतिक महिला दिनानिमित्त Department of Women and Child Development Maharashtra यांच्या वतीने Yashwantrao Chavan Pratishthan येथे ‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी Ram Shinde, Sunetra Ajit Pawar, Aditi Tatkare, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

       कार्यक्रमात वैशाली हिवराळे (जळगाव), सेजल जडेजा (नाशिक), सरिता नाईक (मुंबई), सुरेखा पवार (परभणी), बागेश्वरी रेड्डी (पुणे), ज्योती मीरगणे (बीड), सुवर्णा अग्रवाल (पुणे), मार्जेना दिलावर मणेर, मानसी पटेकर आणि किरण पांडे यांचा सन्मान करण्यात आला.

       मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘विकसित भारत २०४७’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी महिलांचा अर्थव्यवस्थेत सहभाग वाढविणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आणि ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजनांमुळे महिलांना विविध क्षेत्रांत संधी मिळत आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षांत ३७ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्यात आले असून २०२६–२७ पर्यंत ही संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.