नाम फाउंडेशन कडून संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर आणि भडकंबा येथे नदी गाळ उपसाला सुरुवात

संगमेश्वर:-

नाम फौंडेशन व शृंगारपुर ग्रामपंचायत ता-संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने नाम चे जलनाम योजनेतून गाळ उपसा कामास सुरुवात झाली. सिद्धिविनायक वरचीवाडी विकास मंडळ यांचे लोकसहभागातून ब्राह्मणनदी ब्रीज ते गीरकोंड नदी पात्रातील गाळ काढणे कामाचा शुभारंभ मंगळवार दि २४/०५/२२ रोजी गावचे सरपंच सौ श्रेया पवार , विनोद म्हस्के, गजानन चव्हाण ग्रामस्थ व नाम चे समन्वयक समीर जानवलकर यांचे उपस्थित संपन्न झाला.

नाम फौंडेशन व भडकंबा ग्रामपंचायत ता-संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांचे लोकसहभागातून नाम चे जल नाम योजनेतून भडकंबा गावातून वाहणारी काजळी व गड नदी प्रवाहातील कोंडी पुनर्जीवित करणे कामाचा शुभारंभ मंगळवार दि २४ ०५/२२ रोजी गावचे व सरपंच प्रशांत उर्फ बापू शिंदे, श्रीधर कबनूरकर,शेखर आकटे,कमलेश म्हावळणकर, ग्रामसेवक घेवदे व स्थानिक ग्रामस्थ व नाम चे प्रतिनिधी यांचे उपस्थित संपन्न झाला.

नामचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी श्री.भगवतसिंह चुंडावत यांनी माहिती दिली की, ओझरे बुद्रुक येथे देखील गाळ उपसा उपक्रम चालू असून पावसाळ्यापूर्वी चालू असलेली तालुक्यातील सर्व कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.