तीन किलोमीटर परिसरामध्ये पुढील १५ मिनिटांत वीज पडणार आहे, अशी पूर्वसूचना देणारे दामिनी अॅप

रत्नागिरी :-
पुढील १५ मिनिटांत तीन किलोमीटर परिसरामध्ये वीज पडणार आहे, अशी पूर्वसूचना देणारे दामिनी अॅप नैसर्गिक आपत्तीतील जीवितहानी टाळण्यासाठी वरदान ठरणार आहे.हे अॅप भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून तयार केले आहे.
मॉन्सून कधीही धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जून व जुलै या महिन्यात या मॉन्सून कालावधीनंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये परतीच्या पावसावेळी वीज पडण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सकारच्या पृथ्वी मंत्रालयाने दामिनी अॅप तयार केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.