वहाळ येथील प्रसिद्ध मुर्तीकार यांच्या गणपती कारखान्यास ४० वर्षे पूर्ण

कडवई:नियाझ खान 
चिपळूण तालुक्यातील वहाळ गावचे प्रसिध्द गणेश शांताराम महादेव कदम यांच्या गणपती कारखान्यास ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.गणेश मूर्तिकार म्हणून समाजात कदम यांनी आपलीओळख निर्माण केली आहे. शांताराम कदम यांना शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड होती.कदम यांनी वहाळ या आपल्या गावी २१ गणेश मुर्ती काढून कारखान्याची सुरुवात त्यांची मातीकला आणि रंगकला पाहून खेड,चिपळूण, पालवण,शिरंबे,ढोक्रवली,तोंडली-पिलवली,निवळी,आबिटगाव,मुर्तवडे,डेरवण आदि गावातुन त्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध गणेश मूर्तींना प्रचंड प्रमाणात मागणी येऊ लागली आहे.


शाडू मातीपासून गणपती बनवण्याची परंपरा कदम परिवारातील सुनील कदम,संगीता कदम,अक्षदा वरठी(कदम),स्वप्नील कदम,दिपेश कदम, श्वेता कदम व त्यांचे सहकारी यांनी जपली आहे. कदम यांच्या कारखान्यामध्ये एकूण ३५० जास्त गणेश मूर्ती बनवल्या आहेत.नवरात्रीची दुर्गामातेची सुबक मुर्ती देखील त्यांच्या कारखान्यात घडवण्यात येते.गेल्या ४० वर्षांत त्यांनी असंख्य गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
कोकणातील नाभीक समाजातील या कलाकाराचे सर्वत्र कौतुक होत गणेशोत्सव जवळ असल्याने कारखान्यात कामगारांच्या कामाची लगबग दिसून येत आहे. कारखान्यात गणेश मुर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवताना मुर्तीकार व त्यांचे सहकारी दिसून येत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.