मुंबई गोवा महामार्गाच्या प्रमुख मागण्यासाठी मनसेचे आंदोलन स्थगित
आरवली: (सचिन पाटोले)
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गावर उड्डाणपूल व्हावा,चिपळूण ते तलेकांटे पर्यंतचा महामार्ग गणपतीपूर्वी सुस्थितीत व्हावा मुंबई गोवा महामार्ग ची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशात मनसेने या विषयाकडे लक्ष वेधले आहे.तसेच मुबई गोवा महामार्गाच्या नवीन निकृष्ठ कामाची चौकशी व्हावी या प्रमुख मागण्यासाठी मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सकारात्मक पत्रानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले .या आंदोलनाला रिक्षा संघटनेने सक्रिय पाठिंबा दर्शवला होता .
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गचे काम करत असताना कडवई दशक्रोशीतील तसेच धामापूर पंचक्रोशीतील अनेक गावामधील ग्रामस्थ व वाहन चालक यांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आलेला नसून या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा या मागणीवर मनसेच्या वतीने यापूर्वीपासून आवाज उठवला जात आहे.या प्रमुख मागणीसह महामार्गाचे निकृष्ठ कामाची चौकशी व्हावी तसेच खड्डे पडून नादुरुस्त झालेल्या महामार्गांची गणपती पूर्वी दुरुस्ती व्हावी या प्रमुख मागण्यासाठी मुंबई -गोवा महामार्गाच्या दुरावस्थे संदर्भात मनसे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तुरळ येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले .
तुरळ येथे काल(शुक्रवार) झालेल्या या आंदोलनाला रिक्षा संघटना तसेच ग्रामस्थानी सक्रिय पाठिंबा दिला.आंदोलनात सुरवातीला मगामार्गावर खड्ड्यामुळे अपघातात मृत्यू पावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर महामार्ग विभागाचे अभियता रहाटे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक पत्र दिल्यानंतर हे आंदोलन राष्ट्रगीतानंतर स्थगित करण्यात आले.या पत्रात महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते गणपतिपूर्वी पूर्ण केले जाईल .तसेच महामार्गाच्या नवीन कामाला गेलेले तडे पूर्ववत करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे .तुरळ येथील उड्डाणपूल व सुरक्षा यासाठी स्वतंत्र अभियंता याबाबतच्या सर्व श्यक्यतांची पडताळणी करून साईड व्हिजीट करून अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या असून याबाबत लवकरच सकारात्मक विचार होईल असे आश्वासन देण्यात आले आहे .यानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात आले .
याप्रसंगी मनसेचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर,उपतालुकाध्यक्ष नंदकुमार फडकले,महेश गुरव,उदय घाग( चिपळूण),विभागध्यक्ष अजिंक्य चव्हाण,सुरेश घाग,जितेंद्र महाडिक,संजय रसाळ,परेश धामनाक,तुरळ तंटामुक्ती अध्यक्ष रमेश डिके,रिक्षा संघटना उपाध्यक्ष संदीप चिले,सल्लागार मोहन ओकटे,देवरुख शहर अध्यक्ष सागर संसारे,उपशहर अध्यक्ष शेखर नलावडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
(फोटो -राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पत्र स्वीकारताना आंदोलक व पोलीस उपनिरीक्षक पी व्ही देशमुख)
👇
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.