प्रसिद्ध व्यापारी दिलीप खातू यांचे निधन

 

संगमेश्वर:

नावडी येथील दिनेश जनरल स्टोअर्सचे मालक,प्रसिद्ध व्यापारी दिलीप वसंत खातू यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,सून नातवंडे असा परिवार आहे.

गेले ३१ वर्ष संत निरंकारी मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांचा स्वभाव प्रेमळ व मनमिळावू वृत्ती असल्याने अनेक ग्राहकांशी चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गात शोककळा पसरली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.