संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी पाठपुरावा सुरू

संगमेश्वर🙁सचिन पाटोले)

संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचा फायदा हा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, पाटण या चार तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांमधील १.५० लाख लोकसंख्येला थेट होणार आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी या कामासाठी उठाव केला असून चळवळ उभी केली आहे. या चळवळीतून सह्यांची मोहीम राबवली जात असून सह्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व गावांमधील नागरिकांच्या संयुक्त सह्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देण्यात येणार आहे.
या घाटमार्गाच्या कामात लोकसहभाग असावा म्हणून येडगे यांनी या कामासाठी सह्यांची मोहीम चळवळ केली असून, या मोहिमेला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सह्या मोहिमेसाठी एक विशेष पुस्तिका तयार केली असून, यात राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन आणि ज्या गावांना या घाटमार्गाचा फायदा होणार आहे त्या गावांची यादी आणि २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या दाखवली आहे. हे काम २०२४ पर्यंत पूर्ण व्हावे हे या चळवळीचे प्रमुख लक्ष्य ठेवले आहे.
याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी सांगितले. संगमेश्वर ते पाटण या दोन भागांना जोडणाऱ्या घाटमार्गाचे काम व्हावे म्हणून येडगे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची मुंबईत तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन चर्चा करून त्याना निवेदन दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.