पैसा फंड इंग्लिश स्कूल प्रशाळेत दिवाळी निमित्त आकाशकंदील रांगोळी सजावट

संगमेश्वर: (दिनेश आंब्रे)
पैसाफंड इंग्लिश स्कूल शाळेतील ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत २० ते २१ आॅक्टोबर या दोन दिवसी आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वत: आपल्या हाताने तयार केले,तसेच सुंदर अशा रांगोळ्या काढल्या.शाळे समोरील पटांगणात मुलांनी किल्ले तयार केले,ही कलाकृती करीत असताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह व आनंद प्रथम सत्र परिक्षा झाल्यानंतर शेवटच्या दोन दिवसामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या या सुण्त गुणांना वाव देण्यासाठी संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले.


कोरोनाच्या दोन वर्षाच्या या कालावधीनंतर शाळेचे शैक्षणिक वर्ष खऱ्या अर्थाने चालू झाले.त्यामुळे या वर्षातील प्रत्येक सणानिमित्त शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये थोर नेत्यांच्या जयंतीनिमित्त भाषणे,स्वतंत्रदिनानिमित्त देशभक्तीवर समुहगीत स्पर्धा,श्रावण महिन्यातील सणानिमित्त झिम्मा फुगडीचे कार्यक्रम,श्रावणधारा कार्यक्रम घेण्यात विद्यार्थ्यांना सणाचे महत्व या कार्यक्रमातून पटवून देण्यात विद्यार्थ्यांमध्ये एकतेची,समानतेची, मित्रत्वाची सहकार्याची भावना निर्माण व्हावेत हा मुख्य उद्देश असून मोबाईल पासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमात रमविणे गरजेचे आहे.
शाळेमध्ये होणाऱ्या या सर्व उपक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे तसेच मुख्याध्यापक खामकर सर यांचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये,उपाध्यक्ष किशोर पाथरे,सचिव धनंजय शेट्ये,सदस्य संदिप सुर्वे,रमेश झगडे यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.