राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)
दि:२७:जुलै:हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेतून कार्यरत असलेले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे
यांच्या आदेशाने “शिव आरोग्य सेना” या विभागाची सुरवात करण्यात आली आहे. शिवसेना या पक्षाच्या मूळ विचारधारे प्रमाणे राष्ट्रसेवा करीत असताना सर्व सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी या हेतूने हे कार्य अविरत चालू आहे
शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ. सी. शुभा राऊळ, डॉ. श्री. किशोर ठाणेकर – कार्याध्यक्ष-राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांच्या हस्ते शिव आरोग्य सेने च्या राजापूर तालुका समन्वयक पदी श्री. सुभाष शांताराम नवाळे श्री.दिलीप दिवाकर चव्हाण शहर समन्वयक सौ अनुजा राकेश दांडेकर महिला तालुका सहसमन्वयक तर कु.प्रतिक्षा शशिकांत मांजरेकर राजापूर महिला शहर सहसमन्वयक यांची निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर , तालुका प्रमुख कमलाकर कदम ,महिला उपजिल्हा आघाडी दुर्वा तावडे, तसेच सर्व उपतालुका प्रमुख,विभाग प्रमुख, विभागीय संघटक,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,उपविभाग प्रमुख,नगरसेवक,युवासेना, महिला आघाडी,ग्राहक संरक्षण कक्ष,शिव सहकार सेना,व अन्य आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.