मिरज:प्रतिनिधी
दि:२१:नोव्हेंबर: BSP मुस्लिम भाईचारा कमिटी सांगली जिल्हा यांच्या वतीने हजरत टिपू सुलतान यांच्या 273 व्या जयंतीनिमित्त तिरंगा चौकात रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवासदन हॉस्पिटलच्या डॉक्टर अंजुम मुश्रीफ, सिस्टर पूजा परदेशी, रूपाली मालवील, स्टाफ प्रवीण शिंदे यांनीआरोग्य तपासणी शिबिरात सहभागी रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले
तर शाश्वत रक्तपेढीच्या डॉक्टर आशा आदाटे, टेक्निशियन गणेश खोत, राहुल गडदे, रसिका कोकरे, ऋतिका कामीरे यांनी रक्त संकलनाचे काम केले, या कार्यक्रमाचे आयोजन बीएसपी मुस्लिम भाईचारा कमिटीचे सलीम भाई अत्तार गौतम प्राण्यांसूर्य रियाज ढाले बिशाल कांबळे सज्जाद ढाले अमन पठाण वसीम मणेर आलीझ तांबोळी सलमान मणेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
यावेळी हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अय्युब भाई इनामदार शकील बावा पिरजादे, शंकर तात्या परदेशी, युनूस चाबुकस्वार, महेबुबअली मनेर अदिसह मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.