कोरोची ग्रामपंचायतीत बाळशास्त्री जांभेकर जयंती साध्या पण प्रेरणादायी वातावरणात

कोरोची : प्रतिनिधी 

दि.२५:आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कोरोची ग्रामपंचायतीत उत्साहात साजरी करण्यात आली. शासनाच्या परिपत्रकानुसार जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच डॉ. भोरे यांनी आपल्या मनोगतात पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. समाजप्रबोधन आणि लोकजागृतीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारांच्या लेखणीत परिवर्तन घडविण्याची ताकद असते. त्यामुळे पत्रकारांनी सत्य, निडर आणि जबाबदारीची भूमिका निभावत समाजहिताचे लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमात महालक्ष्मी टाईम चे संस्थापक श्री फिरोज शेख,पत्रकार सुरेश कुंभार, अमित काकडे, निहाल ढालाईत, संतोष पाटील व यांचा लेखणी देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी रांझा पाटील, उपसरपंच आनंदी आमते, ग्रामपंचायत सदस्य शितल पाटील, संजय कांबळे, आनंदा लोहार, पूजा टिळे, स्नेहल कोरोचीकर, हलिमा सनदी, सुनील चव्हाण, राजकुमार मिरजकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.