हिरा राम हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश; १० पैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

दि.२५: अशोका शिक्षण संस्था संचलित हिरा राम हायस्कूल, गणेशनगर (इचलकरंजी) येथील विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एनएमएमएस (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शासनाच्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेसाठी शाळेतील एकूण १० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.या पात्र विद्यार्थ्यांना शासनातर्फे इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे एकूण ३६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला आर्थिक बळ मिळणार आहे.या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अशोकराव रामचंद्र जांभळे (अध्यक्ष, अशोका शिक्षण संस्था), मुख्याध्यापक सुरेंद्र सपकाळ सर तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या या यशामुळे गणेशनगर परिसरात आनंदाचे वातावरण असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.