माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.२५:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण हीच काळाची गरज ओळखून निसर्ग संवर्धनाचा वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा सन्मान सोहळा आज माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
माझी वसुंधरा अभियान ४.० आणि ५.० मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेला उत्कृष्ट काम केले बद्दल अनुक्रमे तिसरा व दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने आज शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी वरळी मुंबई येथे ​​ विधानसभा अध्यक्ष ना. ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री ना.श्रीमती सुनेत्रा पवार, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री नामदार पंकजाताई मुंडे व सचिव मा.जयश्री भोज यांचे हस्ते इचलकरंजी महानगरपालिकेस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार आमदार डॉ. राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे,आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या आणिअतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी स्विकारला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.