कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे सभासद शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना

हुपरी :सलीम मुल्ला-
दि ३० :वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व मार्गदर्शन करणार्‍या नामवंत संस्थेच्या वतीने आयोजित ऊसशेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबीरासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे 36 ऊस उत्पादक सभासद शेतकरी रवाना झाले.
शेतकर्‍यांची ऊस शेती किफायतशीर होवून उत्पादनात वाढ व्हावी व त्यामधील सातत्य टिकवण्याच्या दृष्टीने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याद्वारे विविध ऊस विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. शेतीची सुधारीत पध्दत व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाची माहिती सभासद शेतकर्‍यांना व्हावी यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण व परिसंवादाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व मार्गदर्शन करणार्‍या नामवंत संस्थेने ऊसशेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे 36 ऊस उत्पादक सभासद शेतकरी रवाना झाले. या प्रशिक्षणार्थी सभासद शेतकरी यांना केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांनी मार्गदर्शन करून आधुनिक ऊस शेती प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देवून सर्वांना रवाना केले. याप्रसंगी संचालक सुरज बेडगे, आण्णासो गोटखिंडे व शेती मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.