एम.आय.डी.सी. परिसरात “अंबरग्रीस” विक्रीप्रकरणी दोन कोटींचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

रत्नागिरी | ०२ ऑगस्ट २०२५:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रत्नागिरी एम.आय.डी.सी. परिसरात छापा टाकून “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी” (अंबरग्रीस) बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आणलेल्या इसमाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ₹२ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०:४५ वाजता, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आणि एम.आय.डी.सी., रत्नागिरी येथे सापळा रचण्यात आला व एजाज अहमद युसूफ मिरकर, वय ४१ वर्षे रा. घर नं. ३७४६, पिंगी मोहल्ला, मिरकरवाडा, ता. व जि. रत्नागिरी, सध्या रा. कदमवाडी, कोकणनगर, रत्नागिरी यास अटक करण्यात आले.

सदर आरोपीकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना, विक्रीच्या उद्देशाने अंबरग्रीस (Ambergris) साठवून ठेवलेले आढळून आले. त्याच्याजवळून २.५ किलो अंबरग्रीस अंदाजे किंमत ₹२,५०,००,०००/- , मोटारसायकल – अंदाजे किंमत ₹५०,०००/- असा एकूण मुद्देमाल: ₹२,५०,५०,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १५२/२०२५ अन्वये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१, ५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक – श्री. नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पो. हे. का. विजय आंबेकर, पो. हे. का. दिपराज पाटील , पो. हे. का. विवेक रसाळ, पो. हे. का. गणेश सावंत, चालक पो. का. अतुल कांबळे यांनी केली.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटेअपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.