ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
इचलकरंजी:सलीम मुल्लादि .११ :हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ८४ ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी यंदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व मार्गदर्शन करणा-या नामवंत संस्थेमार्फत आयोजित केलेल्या “ऊस शेती ज्ञानयाग” प्रशिक्षणास उपस्थित राहून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते या शेतक-यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षणार्थी शेतक-यांमध्ये जास्तीत जास्त तरूण शेतक-यांच्या सहभागाबद्दल कौतुक केले. ऊस लागण पूर्व मशागत, माती परिक्षण, ऊस जातीची निवड, लागण पध्दत, खते, सिंचन, खोडवा नियोजन व रोग किडींचे योग्य वेळी नियंत्रण इत्यादी बाबींच्या प्रशिक्षणातील आधुनिक तंत्राचा प्रत्यक्ष आपल्या ऊस शेतीमध्ये वापर करावा. तसेच प्रत्येक शेतक-याने आपल्या परिसरातील किमान १० शेतकरी मित्रांना याबाबत मार्गदर्शन करावे जेणेकरून त्यांची ऊस शेती किफायतशीर होवून ऊस उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल असे सांगितले.स्वागत व प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे यांनी केले. यावेळी दोन प्रशिक्षणार्थी तरूण शेतक-यांनी मनोगतामध्ये, “ऊस शेती ज्ञानयाग” प्रशिक्षणाच्या उपयुक्ततेबद्दल माहिती सांगत प्रशिक्षण घेण्याची संधी दिलेबद्दल कारखान्याचे आभार मानले. ज्येष्ठ संचालक आण्णासो गोटखिंडे यांनी आभार मानले.या समारंभास संचालक आदगोंडा पाटील, अभय काश्मिरे व विजय कुंभोजे, सुनिल नारे, सुभाष गोटखिंडे तसेच प्रशिक्षण घेतलेले सभासद शेतकरी आणि शेती खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.