इचलकरंजी –विजय मकोटे
दि ३१ :राज्यातील महायुतीचे सरकार हे गतिमान असून गोरगरीब सर्वसामान्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजनेतून सामान्य जनतेला उभारी देण्याचे काम करत आहे. त्यांना सामान्य तळागाळातील नागरिकांची सुख-दुःखे माहित आहेत. बांधकाम कामगारांनी सरकारच्या पाठीशी राहावे. त्यांच्यासाठी चांगल्या योजना राबवून प्रत्येकाला सक्षम केले जाईल, असे आवाहन आमदार प्रकाश आवडे यांनी केले. इचलकरंजी बांधकाम समन्वय कृती समिती व शिव कामगार सेना यांच्या वतीने ताराराणी पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात आमदार आवाडे यांच्या हस्ते ४०० बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
आमदार आवाडे यांनी, आठ संघटनांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविले जात आहेत. यातून ११ ते १२ हजार बांधकाम कामगार काम करीत आहेत. पूर्वी जनश्री कामगार योजनेतून विविध कामे करण्यात आली. सध्या महिला कामगारांची संख्याही मोठी आहे. प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आम्ही चळवळीचे काम करणारे आहोत. समाजातील तळागाळातील आपलं कोणीतरी आहे, हा विश्वास आम्ही देत आलो आहे. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून इचलकरंजी मध्ये ५२ हजार महिलांना लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना विविध योजनाच्या माध्यमातून सक्षम बनवू. त्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, असे सांगितले.
डॉ. राहुल आवाडे यांनी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या खात्यात जमा होत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी रक्षाबंधनपूर्वीच ओवाळणी दिली आहे. तसेच सरकारकडून वृद्धांना तीर्थक्षेत्र दर्शन, मुलींना मोफत उच्च शिक्षण, सुशिक्षित बेरोजगारांना काम देत आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ व शेतीमालाला हमीभाव देत आहे. हे अखंडित राहण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याची गरज आहे. लोकसभेला इचलकरंजीतून खासदार माने यांना लीड देत आमदार आवाडे हे मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. त्यांनी विधानसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर केली. पण मला त्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मला आपले बहुमोल पाठबळ देऊन विजयी करावे, असे आवाहन केले.
शिवसेना जिल्हा संघटक मोहन मालवणकर व माजी नगरसेवक संजय जाधव यांनी सर्व बांधकाम कामगार राहुल आवाडे यांच्या पाठीशी असून राहुल आवाडे यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे मत व्यक्त केले.
इचलकरंजी बांधकाम समन्वय कृती समितीचे अध्यक्ष सुभाष लोखंडे यांनी स्वागत तर उपाध्यक्ष बंडोपंत सातपुते यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले. याप्रसंगी रशिदा कोलार यांना शिव कामगार सेना तालुका अध्यक्ष पदी व उर्मिला सरवदे यांना उपाध्यक्ष पदी निवडीबद्दलचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रकाश दतवाडे, महावीर जैन, श्रीशैल कित्तुरे, अनिल कांबळे, जमाल नदाफ, उर्मिला गायकवाड, नजमा शेख, सुवर्णा लाड, मंगल सुर्वे, हरिभाऊ सातपुते, गुंड वड्ड, नितेश दीक्षांत, जितेंद्र ठोंबरे, पोपट सातपुते, सत्यजित निंबाळकर, रफिक मुजावर, मनीषा नाईक, संगीता सिंग यांच्यासह मान्यवर व बांधकाम कामगार उपस्थित होते.