इचलकरंजी: संंजय आंबेे
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लबचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रोबस डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी प्रांत 3170 शिवकुमार धड्ड, असिस्टंट गर्व्हनर प्रांत सौ. सुमती अगरवाल उपस्थित होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधत प्रोबस महिला सदस्यांनी महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, फनीगेम्स, स्पॉट गेम्स असे उपक्रम घेतले. त्याचबरोबर कराओके ट्रॅकवरील हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम प्रोजेक्ट कमिटी चेअरमन बाळासाहेब देवनाळ यांनी घेतला.
प्रारंभी स्वागत प्रोबसचे सेक्रेटरी शिवबसू खोत यांनी तर प्रास्ताविक अध्यक्ष विलासराव पाडळे यांनी केले. प्रमुख पाहुणे शिवकुमार धड्ड यांचा सत्कार रोटरी एक्झिक्युटिव्ह प्रोबसचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी सौ. सुमती अग्रवाल यांचा सत्कार सौ. सुजाता कोईक, सौ. सुलतानपूरे यांनी केला. यावेळी सौ. सुमती अगरवाल आणि शिवकुमार धड्ड यांनी, ज्येष्ठांनी स्वतःला म्हातारे न समजता श्रेष्ठ कसे असावे व घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सोबत कसे रहावे याचे उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी क्लबचे स्थापनेपासून आजपर्यंतचा आढावा विषद केला.
यावेळी प्रमुख पाहुणे व सर्व माजी अध्यक्ष, सभासदांच्या उपस्थितीत वर्धापन दिना निमित्त केक कापण्यात आला. कराओके कार्यक्रम यशस्वी केलेबद्दल स्वरसंगम परिवाराचे जुगलजी तिवारी, सौ. सुषमा मिणेकर, प्रभाकर लोहार यांचा व उत्कृष्ठ सूत्रसंचालनाबद्दल सौ. शारदा कवठे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष गजानन शिरगुरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास एम. के. कांबळे, प्रकाश दत्तवाडे, दिलीप शेट्टी, सुर्यकांत बिडकर, महावीर कुरुंदवाडे, अजित कोईक, मोहन भिडे, डी. एम. बिरादार, सुरेश काजवे, विजय पोवार, आप्पा कुडचे, काशिनाथ जगदाळे, डॉ. ए. के. चौगुले, डॉ. प्रकाश पाटील, प्रकाश सुलतानपूरे प्रकाश जगताप, अविनाश खोत, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. वर्षा कुलकर्णी, सौ. प्रमोदिनी देशमाने, सुनिल कोष्टी, सौ. मनिषा कोष्टी, सौ. वसुंधरा कुडचे, सौ. मंजू देवनाळ, सौ. संगिता लडगे, सौ. कमलाक्षी सोनटक्के, सौ. शालिनी जगदाळे, पद्माकर तेलसिंगे, नौशाद जावळे, रघुनाथ काटकर, मनोहर कुराडे, दिलीप भंडारे, सौ. सुप्रिया कोष्टी आदी उपस्थित होते.