डी.के.टी.ई.च्या प्रा.सौ.गौरी कुलकर्णी यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि , १४: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये टेक्स्टाईल डिप्लोमा विभागात कार्यरत असणारे प्रा. सौ. गौरी कुलकर्णी यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन केमिस्ट्री ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा.गौरी कुलकर्णी या गेली १७ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘रिमुव्हल ऑफ सोल्युबल डाइज फ्रॉम टेक्स्टाईल इफल्युएंट बाय ऍडसॉर्प्शन ऑन केमिकली मॉडिफाईड ऍग्रो वेस्ट – अ सस्टेनेबल ऍप्रोच’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी त्यांना डीकेटीईचे केमिस्ट्री विभागाचे प्रा. डॉ. जे.एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
        पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर, डॉ यु.जे. पाटील, विभागप्रमुख प्रा. आर. के. वळसंग, डॉ. जे. एम. पाटील उपस्थित होते.