कोहिनूर सहकारी बँकेला ३१.६४ लाख ढोबळ नफा, सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर”

इचलकरंजी: हबीब शैखदर्जी 

दि.१५: कोहिनूर सहकारी बँक लि. इचलकरंजी या बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे संस्थापक व चेअरमन श्री. धोंडीलाल अब्दुल शिरगावे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभासदाचे स्वागत व अध्यक्षांची निवड बँकेचे संचालक श्री. हारून पाणारी यांनी केले.विविध क्षेत्रातील मान्यवर हे अहवाल सालात दिवंगत झालेले आहेत, त्यांना बँकेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करणेच्या ठरावाचे वाचन बँकेचे जेष्ठ संचालक श्री. नजीर मोमीन यांनी केले.

अहवाल वाचन बँकेचे संचालक श्री. सलीम शिरगावे यांनी केले, व बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अहवाल सालात बँकेच्या ठेवी ३१.४४ कोटी व कर्जे २०.६८ कोटी झाली आहेत, बँकेचा एन.पी.ए. ०.००% असून बँकेला सतत ऑडीट वर्ग “अ “मिळालेला असलेचे नमूद केले.नोटीस व विषयाचे वाचन बँकचे मनेजर श्री. अमजद अफजल मैंदर्गी यांनी केले, त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली,

बँकेने विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मान्यवरांना “कोहिनूर पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.यानंतर बँकेचे सभासद श्री. जाफर मुजावर, श्री. सादिक जमादार, नगरसेवक श्री. परवेज गैबान यांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करणारे विचार मांडले.बँकेचे व्हा. चेअरमन श्री. रुबेन आवळे यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच बँकेचे चेअरमन श्री. धोंडीलाल शिरगावे यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या सभासदांना ९% लाभांश देण्यात येणार असलेचे जाहिर केले.

सुत्रसंचालन श्री. बद्रेआलम देसाई यांनी केले. शेवटी आभार श्री. अल्लाबक्ष बारगीर यांनी मानले व राष्ट्रगीत होऊन सभेची सांगता झाली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. राहुल आवळे, श्री. भगवान कांबूरे, खुतूब गैबान, रियाज जमादार, मुसा खलिफा, समीर शिरगावे, सी.ए. श्री. नागेश बसुदे यांचे सह बँकेचे सर्व संचालक, सेवक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.