मुंबईत राजभवन ,विधानभवन ,जिल्हा कार्यालय ,वर्षा बंगल्यावरती ध्वजवंदन

                                       राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन

     मुंबई: प्रतिनिधी 

दि. २६  :   देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली.  राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली.  राज्यपाल राधाकृष्णन यांनी पत्नी सुमती यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व उपस्थित लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.

                                       जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज वंदन

           भारताच्या७६  व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योगकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.यावेळी जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम कारभारी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत वीर पत्नी यांचा सत्कार मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध विभागातील वैशिष्ट्यपुर्ण कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही  सत्कार यावेळी करण्यात आला.

                                                               वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन

      भारताच्या ७६  व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वज फडकवून भारतीय तिरंग्यास वंदन केले.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                          मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन

                 भारताच्या ७६  व्या  प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते आज दिमाखात ध्वजवंदन करण्यात आले.वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या समारंभास आमदार वरुण सरदेसाई, मुंबईं उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत सिंग दहिया, पोलिस उपआयुक्त मनिष कलवानिया यांनी सलामी दिली.

                      या कार्यक्रमास माजी आमदार झिशान सिद्दिकी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, शहीद परिवाराचे कुटुंबिय, शासकीय अधिकारी, पोलिस, क्रीडा मार्गदर्शक क्रीडा पटू, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खो खो क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या प्रशिक्षक, खेळाडू तसेच गुणवंत मार्गदर्शक व क्रीडापटू यांचा सत्कार करण्यात आला. यात केनिया पुरुष व स्त्री खो-खो संघाचे मुख्य प्रशिक्षक डॉ.नरेंद्र विठ्ठल कुंदर, खो-खो विश्वविजेत्या भारतीय संघामध्ये प्रतिनिधीत्व केलेले अनिकेत भगवान पोटे यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, सन 2022- 23 या वर्षांकरिता क्रीडा मार्गदर्शक रमेश सकट, खेळाडू जान्हवी जाधव, अमन सिंग, रितिका महावर, अक्षता ढोकळे, प्रशांत गोरे, आदित्य खमासे आणि रितेश बोराडे यांना गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार देण्यात आले. सन२०२३-२०२४ या वर्षांकरिता क्रीडा मार्गदर्शक योगेश पवार, खेळाडू निधी राणे, अभिषेक प्रसाद, आंचल गुरव, अर्ना पाटील, आकाश गोसावी आणि नमन महावर यांना गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक राहुल प्रभू यांनी केले.