खेड: सचिन पाटोळे
दि. ०७:- कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका खेड, संलग्न युवा ग्रामीण यांच्या विद्यमाने हरीनाम सप्ताहाचे औचित्य साधून काडवली झगडवाडी येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये एम. ई. एस परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्चसेंटर घाणेखुंट लोटे, खेड च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी युवा धामणदेवी गटाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्रनाथ मांजरेकर , ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शरद खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णाजी लांबे, ग्रामीण युवा अध्यक्ष श्री सुरज जोगळे,सुधीर वैराग, संजय साळवी, सुभाष हुमणे, सुरज कानाल, मंदार शिर्के कुणबी युवा ग्रामीण, कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीणचे कार्यकर्ते उपस्थित होते.
एम. ई. एस. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्चसेंटरचे डॉक्टर,परिचारिका यांनी काडवली गावातील मोफत तपासणी करुन त्याच्या औषध उपचार केले तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी. या बदल मार्गदर्शन केले.कुणबी समाजाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. असे उपक्रम खेड तालुक्यातील सर्व गावामध्ये राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.