साखरपा,प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न

संगमेश्वर:-मुुजीब खान

                   साखरपा, देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकत्याच रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या ॲम्बुलन्सपैकी साखरपा आणि देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध झालेल्या ॲम्बुलन्स चा लोकार्पण सोहळा लांजा राजापूर विधानसभा आमदार डॉ.राजन साळवी यांच्या मुख्य उपस्थित पार पडला.यावेळी संगमेश्वर तालुका पंचायत समिती सभापती जया माने उपस्थित होते.

महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री सन्मा. उद्धव साहेब ठाकरे, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब , रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिलजी परब , उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत , रत्नागिरी -सिंधूदूर्गचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत , लांजा राजापूर विधानसभा आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून ह्याॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब ह्यांच्याकडे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या सतत पाठपुराव्यातुन ८रुग्णवाहिकाराजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे साखरपा आणि देवळे प्राथमिक आरोग्य केंद्राना ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात आली.यासाठी आमदार राजन साळवी ,सभापती जया माने यांनी प्रयत्न केले.ह्या ॲम्बुलन्समुळे परिसरातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.अनेक दिवसापासून ह्या केंद्राला ॲम्बुलन्स मिळावी अशी स्थानिकांची मागणी होती.त्या मागणी नुसार येथे ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्याने परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

श्रीफळ वाढवून आणि फित कापून लोकार्पण सोहळा पार पडला.चालकांना पुष्गुच्छ देऊन आमदार राजन साळवी यांनी शुभेच्छा दिल्या.आमदार राजन साळवी यांच्या समवेत सभापती जया माने, जि. प. सदस्या रजनी चींगळे, दाभोळे प. स.सदस्य संजय कांबळे, उप तालुका प्रमुख काका कोलते, मनोहर सुकम,शेखर आकटे, अजय सावंत, प्रवीण जोयशी,दत्ता घुमे, बापू शेट्ये,राजा वाघधरे,बापू शिंदे, मंगेशदळवी,राजेश शेलार,लक्ष्मण शिंदे,रवींद्र कामेरकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे मॅडम, आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.