इचलकरंजी,:राम आवळे
दि. १८ :भारतीय जनता पक्ष इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त मंडळाध्यक्षांचा दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पूर्व मंडळ अध्यक्ष श्रीरंग शिवाजीराव खवरे, पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत मोहीते आणि ग्रामीण मंडळ अध्यक्ष बाळासाहेब माने यांचा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत भाषणाने केली. यावेळी त्यांनी म्हणाले, “इचलकरंजी शहर व परिसरातील वस्त्रोद्योग, पाणी, वीज आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी नव्या नेतृत्वाने पुढाकार घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. भाजपाचे हे नवे पदाधिकारी औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास वाटतो.”सत्काराला उत्तर देताना शशिकांत मोहीते म्हणाले, “इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासमोरील अडचणी, पाण्याची टंचाई यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भाजपाच्या संघटन विस्तारासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपल्या असोसिएशनने केलेल्या या सन्मानाबद्दल आम्ही मन:पूर्वक आभार मानतो.”या प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष रफीक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, सोमा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडुरंग सोलगे, सुभाष बलवान, राजाराम गिरी, तसेच प्राईड इंडिया टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश आमाशे, उद्योजक सुकुमार देवमोरे, शिलकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेच्या वतीने करण्यात आले.