लेखिका शीला माने यांना संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार प्रदान

‘थोर समाजसुधारक’ पुस्तकाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि .२४ : लेखिका सौ. शीला सतीशकुमार माने यांच्या ‘थोर समाजसुधारक’ या पुस्तकाला समृद्धी प्रकाशन संस्था, हनुमान नगर, हिंगोली यांच्या वतीने प्रतिष्ठेचा संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी केलेल्या साहित्यिक कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात साहित्यिक तथा लेखक गुरव सर यांच्या हस्ते सौ. माने यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
‘थोर समाजसुधारक’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजसुधारकांचे विचार, कार्य आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांचे योगदान वाचकांसमोर मांडण्यात आले आहे. या साहित्यकृतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या साहित्यिक कार्याला विशेष प्रोत्साहन मिळाले आहे.या राष्ट्रीय पुरस्कारामुळे सौ. शीला सतीशकुमार माने यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून साहित्यिक, वाचक आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.