इचलकरंजी:अन्वर मुल्ला
दि २ ऑगस्ट: मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांला याचा फायदा होणार आहे. या भागातील नागरिकांची ४५ वर्षापासूनची ही फार जुनी मागणी होती. त्यासाठी लढा सुरु होता. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यामुळे मुंबई उच्य न्यायालयावरील कामाचा ताण कमी होऊन नागरिकांची प्रलंबित खटले निकालात निघण्यास मदत होणार आहे. तसेच ६ जिल्ह्यातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना न्याय लवकर मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तत्कालीन आमदार प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, प्रकाश आवडे यांनीही सातत्याने पाठपुराव केला होता. अखेर त्याला यश आले.
भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई जी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश मा. आलोक आराधे जी यांचे मनापासून आभार मानतो. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे. असे उद्गार आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला. तसेच कोल्हापूरात खंडपीठ व्हावे यासाठी गेली अनेक वर्ष जे लोकप्रतिनिधी वकील, बार असोसिएशन, विविध सामाजिक संघटना यांचे आभिनंदन यानिमित्ताने केले. यावेळी मलाबादे चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी, पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशीकांत मोहिते, ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने, पै.अमृतमामा भोसले, अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, राजेश रजपुते, प्रकाश दत्तवाडे, प्रसाद खोबरे, शेखर शहा, उमाकांत दाभोळे, महेश पाटील, भारत बोंगार्डे, शिवानंद रावळ, शुभम बरगे, प्रमोद बचाटे, सौ.अश्विनी कुबडगे, सौ. सपना भिसे, सौ.नीता भोसले, सौ.सीमा कमते, शबाना शहा, सौ.सुवर्णा लाड, नागुबाई लोंढे, मंगल सुर्वे, अमिता बिरंजे, नजमा शेख, सुधीर पाटील, सनी ओऊळकर, काशिनाथ पुजारी, नरसिंग परीक, बाळकृष्ण तोतला, राहुल घाट, सागर कचरे, सतीश मुळीक, संजय गेजगे,प्रदिप मळगे, सचिन माळी, सलीम शिकलगार, प्रवीण रावळ, सतीश भस्मे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.