इचलकरंजी –विजय मकोटे
दि .१५ : देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डेक्कन चौकातील अशोकराव जांभळे जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रास्ताविक अमोल भाटले यांनी केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी, महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे. कै. नितीन जांभळे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी कार्याध्यक्ष अमित गाताडे, माजी बांधकाम सभापती लतीफ गैबान, वसंतराव मुळीक, वसंत पाटील, जंबा पाटील, प्रल्हाद सावंत, प्रकाश धुमाळ, अमर सडगर, शहर महिला अध्यक्ष प्रिया बेडगे, प्रियंका कांबळे, सुनिता चव्हाण, सैफ मुजावर, नासिर अपराध, निहाल कलावंत, शाहीर मारुती इंगळे शिवाजी शिंदे, जयदीप जांभळे, शिवाजी पाटील, प्रा. सुरेंद्र सपकाळ, गुड्डू शेख, रमेश कांबळे, दशरथ माने, सुरेश गथडे, सचिन कांबळे, राहुल ज्वारे, फयाज बागेवाडी, नवाळे, प्रकाश नेमीष्टे, नारायण ताम्हणकर, सुशील कुमार आरेकर, विनोद गायकवाड, संजय बडवे, पप्पू लोंढे, महेश घाडगे मुकुंद कांबळे, योगेश खांडेकर, जावेद मुजावर, फिरोज मोटरवाले, समीर सोलापूरे, त्यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.