इचलकरंजी :विजय मकोटे
दि .२६: जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांचेतर्फे आयोजित शालेय शासकीय १४,१७, व १९ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धांना मंगळवार दि. २६ ऑगस्ट, २०२५ रोजी गोविंदराव हायस्कूलच्या मैदानावर प्रारंभ झाला.स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती विद्या कदम व सहा. आयुक्त श्रीमती रश्मी गोडे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, इचलकरंजी महानगरपालिका क्रीडा समिती सदस्य व ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शहा, गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक बी. पी. कवटगे, पर्यवेक्षक एस. व्ही. पाटील, आर. डी. पिष्टे, ए. बी. कांबळे यांची उपस्थिती होती.
क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, आकाश माने तसेच स्पर्धाप्रमुख संदीप लाड यांनी स्पर्धेचे नियोजन केले.याप्रसंगी क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी, अमित पाटील, अमित कागले, राहुल जोशी, संभाजी बंडगर अमर भिसे, सचिन खाडे, सुहास पवळे, कृष्णा अडकिल्ला, तुषार जगताप, अमोल पालकर, पारसे इत्यादी क्रीडाशिक्षक, पंच, मार्गदर्शक, खेळाडू उपस्थित होते