जोडी तुझी माझी’ स्पर्धेत मेघा उत्तुरे-कोमल शिंदे जोडी अव्वल; सुरेल सुरांनी रंगली ‘गोल्डन मेलोडीज’ नाईट

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी 
दि .६ : इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ अंतर्गत आयोजित ‘जोडी तुझी माझी’ या आगळ्यावेगळ्या मराठमोळ्या स्पर्धेत मेघा उत्तुरे व कोमल शिंदे (प्रथम) या जोडीने विजेतेपद पटकावले. नवरा-बायको, वडील-मुलगी, आई-मुलगा, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण अशा तब्बल ४७ जोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पारंपरिक वेशभूषेत सजून, गाणी, मिमिक्री, नृत्य, नाटक अशा विविध कलांनी सहभागी जोड्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

स्पर्धेचा शुभारंभ श्रींची महाआरती करून मारवाडी युवा मंच मिडटाऊन अध्यक्षा सौ. अनिता जैन, कोषाध्यक्ष सरीता तिवारी व भाजपा जिल्हा सरचिटणीस रमा फाटक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. शाहीर संजय जाधव यांनी गणेश वंदना सादर करून वातावरण भारावून टाकले. परिक्षक म्हणून सलोनी कबाडे व अर्पिता रबाडे यांनी काम पाहिले.

विजेत्यांमध्ये –

प्रथम : मेघा उत्तुरे व कोमल शिंदे

द्वितीय : स्वरा बिरांजे व तन्वी काटकर

तृतीय : रिध्दी सुतार व अमृता बारवाडे

उत्तेजनार्थ : निशांत सावंत-देवेश व्यास व दर्शन लड्डा-सिध्दी भंडारी

या वेळी गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शितल सुर्यवंशी, सपना भिसे, सीमा कमते, अर्चना कुडचे, नजमा शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळच्या सत्रात रंगलेल्या ‘गोल्डन मेलोडीज – द ग्रँड म्युझिकल नाईट’ कार्यक्रमात हिंदी व मराठी गीतांच्या सुरांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचा शुभारंभ पोलिस उपअधीक्षक विक्रांत गावकवाड यांच्या हस्ते महाआरती तसेच पोलिस निरीक्षक महेश चव्हाण व सपोनि प्रशांत निशाणदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला.

कलाकार प्रशांत होगाडे, नीता ठाकूर-देसाई, प्रविण होगाडे, डॉ. दीपक कुंभार, महेश शिंदे यांनी जुन्या ते नव्या गाण्यांपर्यंतच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संगीत संयोजन विक्रम पाटील यांचे होते, तर ऋतिक कुरणे, गणेश साळोखे, चंद्रकांत घारुंगे, सर्जेराव कांबळे, स्नेहल जाधव, प्रकाश साळोखे यांनी साथ दिली. निवेदन स्वप्निल पन्हाळकर यांनी केले.

यावेळी महालक्ष्मी  टाइम्स चे संस्थापक संपादक फिरोज शेख ,अहमद   मुजावर, शेखर शहा, संग्राम सटाले, सौरभ पाटील, मुञ्जमिल सय्यद, सप्रेम पटेकरी, महादेव लवटे, सत्येन राजमाने बबन केटकाळे  पत्रकार युवराज पाटील (कबनूर ) आदी मान्यवर उपस्थित होते.