रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांची अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कारवाई

 

रत्नागिरी: सिद्धेश मराठे
दि:२१ तहसीलदारर शशिकांत जाधव हे पीक कापणी प्रयोगासाठी खालगांव येथे जात होते. त्यावेळी निवळी ते गणपतीपुळे रस्त्यावर एका हॉटेलच्या ठिकाणी 3 वाहने (2 काळा दगड आणी 1 डस्ट) उभी असलेली आढळली. त्यानंतर तहसीलदार यांनी सबंधीत वाहन चालक यांच्याकडे पासबाबत विचारणा केली असता तिन्ही वाहनांकडे पास नसल्याचे वाहन चालकांने सांगितले.

त्यादरम्यान आणखीन एक जांभा दगड घेऊन जाणारे वाहन तहसीलदार यांनी रस्त्यावर अडवुन पासबाबत विचारणा केली. या वाहनाकडे सुध्दा पास नसल्याचे वाहन चालक यांनी सांगितले.त्यानंतर तहसीलदार रत्नागिरी यांनी निवासी नायब तहसीलदार श्रीम मणचेकर, मंडल अधिकारी श्री पाटील, तलाठी करबुडे श्री चव्हाण आणि महसुल सहायक अमोल कांबळे यांना सदर ठिकाणी बोलावुन पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर चारही वाहनांचे पंचनामे करण्यात आली आणि सदर वाहने ताब्यात घेऊन तलाठी करबुडे, कोतवाल करबुडे आणि पोलीस पाटील करबुडे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत.सदर अनधिकृत गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांना दंडाची नोटीस देण्यात आलेली आहे. या कारवाईत तहसीलदार रत्नागिरी शशिकांत जाधव, निवासी नायब तहसीलदार श्रीम मणचेकर, मंडल अधिकारी तरवळ श्री पाटील, तलाठी करबुडे श्री चव्हाण, महसुल सहायक अमोल कांबळे, कोतवाल करबुडे आणि वाहन चालक श्री डिचोलकर यांनी सहभाग घेतला.