कबनूर –हबीब शेख दर्जी
दि .२५ : रौप्य महोत्सवी श्री शांतीनाथ पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मिलींद कोले यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतीक भवन दिगंबर जैन मंदीर, कबनूर येथे संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस मॅनेजर यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन झाले. तद्नंतर संस्थापक कै. श्री. सुधाकर देवाप्पा मणेरे मामा यांच्या प्रतिमेचे पुजन झाले व संस्थेचे ज्ञात अज्ञात सभासद, विविध कारणामुळे निधन झालेले देशातील नागरीक यांच्या दुःखद निधनाबद्दल सभेत श्रध्दाजंली वाहण्यात आली. त्यानंतर मॅनेजर चंदुलाल फकीर यांनी नोटीसवरील सर्व विषयांचे वाचन केले. त्या सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.
चेअरमन मिलींद कोले यांनी संस्थेचा अहवाल, नफा-तोटा व ताळेबंद याचे वाचन केले व अहवाल सालात संस्थेची उलाढाल रु.२५ कोटीची झाली आहे. खेळते भांडवल रु.१० कोटी ७७ लाख इतके झाले असून तरतुदी वजा जाता अहवाल सालात संस्थेस निव्वळ नफा रु.१३ लाख ६९ हजार झालेला आहे. संचालक निर्णप्रमाणे या वर्षीसुध्दा सभासदांना १२% डिव्हीडंड देणार असल्याचे जाहीर केले. ग्राहकाभिमुख पारदर्शी व्यवहार व संस्थेवरील खातेदारांचा अटळ विश्वासाच्या जोरावर संस्थेने प्रगती केले असलेने या पुढेही आपल्या विश्वासाच्या जोरावर संस्था उत्तुंग भरारी घेईल असे सभेप्रसंगी ग्वाही दिली.
त्यानंतर माजी सरपंच मधुकर मणेरेमामा यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या कामकाजाचाआढावा घेत असताना संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचाही उहापोह केला. जागतीक मंदीमध्येही संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेजर व ऑफीस स्टॉफ यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये केलेले कार्य व दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या सभेमध्ये पतसंस्थेचे सभासद विलास बापू कुंभार यांची इंदिरा कॉलनी पतसंस्था मर्यादित कबनूरच्या संचालक पदी निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करणेत आला. त्याच बरोबर कबनूर हायस्कुल मधील प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी इंगवले ज्योतिरादित्य उदय, संकनपल्ली श्रावणी राकेश, चोथे संकेत सुनिल व मणेरे हायस्कुल मधील प्रथम आलेले गोईलकर गौरंग मोतिराम, फासे वेदिका सुनिल, भंडारे सावली अरविंद यांचे अभिनंदन करुन प्रमाणपत्र व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर सभेस व्हा. चेअरमन सुभाष केटकाळे, संचालक रमेश केटकाळे, बाळासो केटकाळे, ज्ञानदेव बडवे, किरण कांबळेसर, नजरुद्दीन मुजावर, आनंदा कदम, राजेंद्र शेटे, सुरेखा सुरेश केटकाळे, सिमा संजय लिगाडे, संगिता पाटील, स्वाती कोले, संजय केटकाळे, मधुकर मणेरे, मनोहर मणेरे अरुण केटकाळे, राजाराम वाकरेकर, सुरेश केटकाळे, संजय लिगाडे, विलास कुंभार, महावीर पिंपळे, आण्णाप्पा चौगुले यांच्यासह ऑफीस स्टॉफ धंनजय कोले, अशोक केटकाळे, अनिल हजारे, बाळासो पुजारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते. शेवटी किरण कांबळेसर यांनी आभार मानुन सभा संपलेचे जाहीर केले.