इचलकरंजी : विजय मकोटे
दिि २३ हातकणंगले तालुका विधी सेवा समिती मार्फत मा.श्री.र.ना.बावनकरसो ( जिल्हा न्यायाधीश इचलकरंजी ) यांचे मार्गदर्शन खाली सुप्रीम कोर्ट आयोजित आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे जनजागृती अभियानाच्या माहिती फलकाचे अनावरण श्री अनिल बमन्नावर ( सदस्य-हातकणंगले विधी सेवा समिती ) यांचे शुभ हस्ते व श्री नवनाथ सूळ ( पोलीस उपनिरीक्षक) श्री सोमनाथ कुडवे ( पोलीस उपनिरीक्षक) यांचे प्रमुख उपस्थितीतीत करण्यात आले
यावेळी न्यायालयीन कर्मचारी श्री अभिजित पाटील,श्री किशोर कांबळे, श्री गजानन शिरगांवे (सामाजिक कार्यकर्ते ) श्री रवी वासुदेव (सामाजिक कार्यकर्ते),श्री सुनीत कोळी(सहायक फौजदार)पो.शशी डोणे,पो.रवींद्र महाजन,पो.ज्ञानेश्वर बांगर,पो.असिफ सिराजभाई,पो.रवींद्र पाटील उपस्थित होते