इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२० :शहरातील मुख्य रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आलेने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शहरातील ज्या रस्त्यांवर धुळीचे प्रमाण जास्त आहे अशा सर्व रस्त्यांवर पाण्याची फवारणी करणेचे आदेश उपायुक्त नंदू परळकर यांना दिले होते.या आदेशानुसार महानगर पालिका वाहन विभागाने एक मोठा आणि चार लहान ट्रॅक्टरच्या माध्यमातून शहरातील शिवतीर्थ ते विकली मार्केट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक, राजवाडा चौक, नाट्यगृह, हत्ती चौक, जिम्नॅशियम मैदान, दाते मळा, चांदणी चौक, शिवतीर्थ ते डेक्कन चौक, दत्तनगर, महासत्ता चौक ते सांगली नाका, शहापूर चौक ते डेक्कन मागील बाजू, अटल बिहारी चौक ते छत्रपती शाहू महाराज पुतळा चौक विविध ठिकाणच्या जवळपास ४५ किलोमीटर रस्त्यावर पाण्याची फवारणी केली.
या पाणी फवारणी मुळे शहरातील धुळीचे प्रमाण कमी होत असल्याने नागरिकांच्या कडून समाधान व्यक्त होत आहे. यापुढे काही दिवस महानगरपालिकेकडून याप्रमाणेच शहरातील विविध रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जाणार आहे. वाहन विभागाकडील पाण्याच्या टँकरला पाणी फवारणी साठी तयार करणेसाठी अग्निशामन अधिकारी सौरभ साळुंखे, मेकॅनिक अनिल कांबळे आणि अजित खवरे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच विवेक अतिग्रे, विष्णू जाधव, सतीश जाधव, खाजू कलावंत, अक्षय आळंदे , प्रमोद कुंभार यावाहन चालकांनी काम केले.