जिल्हाधिकारी कार्यालय – संविधान दिन साजरा

कोल्हापूर:  रेणू पोवार 

दि.२६ : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अशोक स्तंभाजवळ आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे त्यांच्यासह महसूल विभागातील इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.