इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२५ : श्रीमंत गंगामाई जुनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर श्री. स्वप्निल तांबेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले.यावेळी त्यांनी मुलींना करिअरच्या विविध संधी याबद्दल ओघवत्या शब्दात मार्गदर्शन केले. विविध स्पर्धा परीक्षा कशा असतात त्यांना कसे सामोरे जायचे तयारी कशी करायची याबद्दल मुलींना सहज सुलभ शब्दात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.एस.काजी तसेच उपप्राचार्य व्ही.जी.पंतोजी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. कवळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार एस एस पाटील सर यांनी केले.यावेळी जी.आर. मंडलिक, आर.पी. इंगळे,आर.बी. पाडवी, एस.आर.चोथे, व्ही.एस.पाटील, एस.जी.माने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.